मुंबई- सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार आज सावरला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,६२७.७३ अंशांनी वधारून २९,९१५.९६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ४८२ अंशांनी वधारून ८,७४५.४५ वर स्थिरावला होता.
मुंबई शेअर बाजार दुपारी १ वाजू ४६ मिनिटाला २,११९ अंशांनी वधारून ३०,४०८.२० वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ५७०.१० अंशांनी वधारून ८,४४२.५५ वर पोहोचला आहे.
मुंबई शेअर दुपारी १२ वाजून २४ मिनिटाला १,३२७.६० अंशांनी वधारून २९,६१५.८३ वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ३८४.५० अंशांनी वधारून ८,६४७.९५ वर पोहोचला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिणामानंतर उद्योगांना दिलासा देण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे. त्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुंबई शेअर बाजार खुला होताना १५८ अंशांनी वधारून २८,४४६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६८.६५ अंशांनी वधारून ८,३३२.१ वर पोहोचला.
कोरोनाच्या धास्तीने शेअर बाजारात गेल्या चार दिवसात मोठी पडझड झाली आहे. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी सुमारे १९.४ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.