मुंबई- कोरोनाचे देशातील रुग्ण वाढत असल्याने शेअर बाजार गुंतवणूकदारांनी प्रचंड धसका घेतला आहे. मुंबई शेअर बाजारात ३,९३४.७२ अंशांनी पडझड झाली आहे. ही शेअर बाजारामधील आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार २५,९८१.२४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १,१३५ अंशांनी घसरून ७,६१० वर स्थिरावला.
शेअर बाजार निर्देशांक ४ हजार अंशांनी कोसळून २६,००० अंशांच्या खाली पोहोचला होता. शेअर बाजार बंद होताना ३,९३४.७२ अंशांनी पडझड झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशातील उद्योग व व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात सकाळपासून मोठी पडझड झाली आहे. मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात ३,१८२.८८ अंशांनी घसरून २६,७३३.०८ वर पोहोचला.