हैदराबाद -अनेक शतकांपासून भारतीय लोक हे सोन्यामधील गुंतवणुकीला प्राधान्य देत आले आहे. शेअर बाजार, म्यूच्युअल फंड व स्थावर मालमत्ता आदी गुंतवणुकीचे पर्याय असले तरी सोन्यांमधील गुंतवणूक हे नेहमीच वाढलेली आहे. विशेषत: अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला असताना ही गुंतवणूक वाढलेली आहे.
सध्या, आर्थिक संकट असतानाही गुंतवणूकदारांनी सोन्यामधील गुंतवणुकीला पसंती दिली आहे. असे असली तरी बहुतांश गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये कधी गुंतवणूक करायची याची नेमकी माहिती नसते. ही शंका दूर करण्यासाठी ईटीव्ही भारतने बाजाराचे तज्ज्ञ सतीश कनथेटी यांच्याशी संवाद साधला. त्याविषयी संक्षिप्त माहिती जाणून घ्या.
हेही वाचा-फेसबुकसह व्हॉट्सअपची चौकशी प्रकरण: दिल्ली उच्च न्यायालयाकडून निकाल राखीव
सोन्याच्या किमती कशा ठरतात?
झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात. तर डॉलरचे मूल्य घसरल्यानंतर सोन्याच्या किमती वाढायला लागतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काही संकेत दिल्यानंतर अलीकडे सोन्याच्या किमती घसरल्याचे कानथेटी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.