नवी दिल्ली - सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. निफ्टीने पहिल्यांदाच 16,00 चा टप्पा ओलांडला आहे. तर निर्देशांक 550 ने वाढल्यानंतर शेअर बाजाराने 53,500 चा टप्पा ओलांडला आहे.
टायटनचे सर्वाधिक सुमारे 4 टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ सन फार्मा, भारती एअरटेल, एचडीएफसी, इंडसइंड बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-वाढत्या महागाई विरोधात राहुल गांधींचा संसदेवर सायकल मार्च; विविध विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग
कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. दुसरीकडे वित्तीय तूट कमी होत असताना करसंकलनाचे आणि निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 55.3 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वधारल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे चिफ इनव्हेस्टमेंट स्ट्रॅटजीट व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.
हेही वाचा-नवी दिल्लीत शरद पवार घेणार अमित शहांची भेट
कोरोनाच्या काळात निर्बंध असतानाही जुलैमध्ये जीएसटीचे संकलन वाढले आहे. गुंतवणुकदारांच्या संपत्तीत शुक्रवारपासून एकूण 3,45,729.69 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.