नवी दिल्ली- ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे दर वाढल्याने होणाऱ्या आर्थिक झळीतून ग्राहकांची काही प्रमाणात सुटका होणार आहे. अदानी विलमार, रुची सोया इंडस्ट्रीजसह विविध खाद्यतेल कंपन्यांनी प्रति लिटर 4 ते 7 रुपये कपात केली आहे. या मोठ्या कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी केल्यानंतर इतर कंपन्यांकडून खाद्यतेलाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
मोठ्या खाद्यतेल कंपन्यांबरोबर जेमिनी इडिबल, फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल, गोकुळ रिफॉईल, सॉल्वहंट, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्से आणि एन. के प्रोटिन्स कंपनीही खाद्यतेलाच्या दरात कपात केली आहे. सॉल्वहंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ही (एसईए) खाद्यतेल कंपन्यांची संस्था आहे. या संस्थेने खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा-गोव्यात नाराजांची बंडाळी भाजपला भोवणार.. आप अन् तृणमूलच्या प्रवेशाने गोव्याच्या राजकारणात रंगत
उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे एसईएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी म्हटले. जगभरातील खाद्यतेलाचा पुरवठा सुधारत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत, असे चतुर्वेदी यांनी म्हटले. लग्नसराई समारंभ संपल्यानंतही देशातील खाद्यतेलाच्या कमी होणार आहेत.