महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू

शेअर बाजार, आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँकांसारख्या संस्था, शेअर दलाल, सेबीमध्ये नोंदणी केलेल्या काही संस्था यांना बंदमधून वगळण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Mar 20, 2020, 4:50 PM IST

मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीमधील शेअर बाजाराचे कामकाज बंद दरम्यानही सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख महानगरांमधील सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची आज घोषणा केली आहे. यामधून त्यांनी शेअर बाजार, डिपॉझटरी व शेअर दलाल यांना वगळले आहे.

शेअर बाजार, आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँकांसारख्या संस्था, शेअर दलाल, सेबीमध्ये नोंदणी केलेल्या काही संस्था यांना बंदमधून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा-कोरोना कहर : जगभरात मृतांचा आकडा १० हजारांच्या पुढे; सुमारे अडीच लाख बाधित

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. फेसबुकवरून बोलताना त्यांनी मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील दुकाने बंद करणार असल्याचे जाहीर केले. तर फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा-COVID-19 LIVE : अफवांना बळी पडू नका, माहितीसाठी टोल फ्री नंबरवर फोन करा; आरोग्य मंत्रालयाचे आवाहन..

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडामधील सर्वात जुना शेअर बाजार आहे. दरम्यान, गेली चार दिवस घसरण झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सावरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details