महाराष्ट्र

maharashtra

लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरला मोठा फटका; पाच दिवसांत ४८ टक्क्यांनी घसरण

By

Published : Nov 23, 2020, 2:15 PM IST

लक्ष्मी विलास बँकेचे शेअर १० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराने आखून दिलेल्या लोअर सर्किटच्या मर्यादेहून शेअर घसरले आहेत. मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी विलास बँकेच्या प्रति शेअरची किंमत ८.१० रुपये आहे.

लक्ष्मी विलास बँक
लक्ष्मी विलास बँक

नवी दिल्ली - लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये सलग पाचव्या सत्रात घसरण झाली आहे. लक्ष्मी विलास बँकेचे शेअर पाच दिवसात ४८ टक्क्यांनी घसरले आहे. या बँकेच्या शेअरची जोरदार विक्री झाली आहे.

लक्ष्मी विलास बँकेचे शेअर १० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराने आखून दिलेल्या लोअर सर्किटच्या मर्यादेहून शेअर घसरले आहेत. मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी विलास बँकेच्या प्रति शेअरची किंमत ८.१० रुपये आहे. निफ्टीत १० टक्क्यांनी घसरून शेअर किंमत ८.१० रुपये आहे.

लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस इंडियाच्या विलिनीकरणाची नियोजित योजना आरबीआयने निश्चित केल्याप्रमाणे शुक्रवारी जाहीर केली नाही. ही योजना पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये २० टक्क्यांनी घसरण; लोअर सर्किटहून कमी किंमत

आरबीआयचे लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध

आर्थिक संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्बंधानुसार बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी केवळ २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. जूनच्या तिमाहीत ११२ कोटी रुपयांचा तोटा आणि सप्टेंबरच्या तिमाहीत ३९७ कोटींचा तोटा दर्शविणाऱ्या लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंधने घालण्यात आलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत बिघडणारी बँकेची आर्थिक परिस्थिती आणि संचालक मंडळाकडून करण्यात आलेले निष्फळ प्रयत्न यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकूण ३० दिवसांसाठी हे निर्बंध राहणार आहेत.

हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाची योजना; आरबीआय पुढील आठवड्यात करणार जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details