महाराष्ट्र

maharashtra

गुगल प्ले स्टोअरवरून 'जिओमार्ट' अ‌ॅप दहा लाखांहून अधिक डाऊनलोड

By

Published : Jul 24, 2020, 4:20 PM IST

जिओमार्टमध्ये पूजा साहित्य, कार आणि स्वयंपाकघरातील उत्पादने आदींचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. जिओमार्टमध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीवर ग्राहकांना कमीत कमी 5 टक्के सवलत देण्यात येत आहे.

जिओमार्ट
जिओमार्ट

मुंबई – रिलायन्स जिओने किराणा सामान विक्रीचे सुरू केलेल्या जिओमार्ट अॅपला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या जिओमार्ट अॅपचे दहा लाखांहून अधिक गुगल प्लेवरून डाउनलोड झाले आहे. शॉपिंगच्या श्रेणीत जिओचा पहिल्या तीन अॅपमध्ये समावेश आहे.

पोर्टलनंतर अॅप सुरू केले तरी ग्राहकांना त्यांच्या मागील ऑर्डर आणि खरेदीचे व्यवहार दिसू शकतात. या अॅपची मार्चअखेर देशातील 200 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात आली आहे. श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांमधील ग्राहकांना फळे, पालेभाज्या आणि आदी जीवनावश्यक वस्तू घरोपोहोच दिल्या जात आहेत. जिओमार्टमधून सतत नवनवीन उत्पादने उपलब्ध करून दिले जात असल्याचे बाजार विश्षेकांनी सांगितले.

जिओमार्टमध्ये पुजा साहित्य, कार आणि स्वयंपाकघरातील उत्पादने आदींचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. जिओमार्टमध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीवर ग्राहकांना कमीत कमी 5 टक्के सवलत देण्यात येत आहे. नुकतेच रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी यांनी जिओमार्टमधून रोज 2.5 लाख ऑर्डर घेतल्या जात असल्याचे सांगितले होते. जिओमार्टमधील ऑर्डर पहिल्या दिवसापासून खूप वेगाने वाढत असल्याचेही अंबानी यांनी म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details