मुंबई- यंदा सणासुदीत मौल्यवान दागिन्यांची मागणी वाढेल, असा सराफ व्यावसायिकांना विश्वास आहे. धनत्रयोदशीला गतर्षीच्या तुलनेत ७० टक्के व्यवसाय वाढेल, असे ऑल इंडिया जेम्स आणि ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलने म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या संकटात सोन्याच्या किमती वाढत आहे. असे असले तरी दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी आणि आगामी लग्नसराईमुळे पुन्हा सोन्याची मागणी वाढणार आहे. ऑल इंडिया जेम्स आणि ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे (जेजीएफ) चेअरमन अनंत पद्मनाभन म्हणाले, की सणासुदीत सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे यंदा धनत्रयोदशीलाही गतवर्षीच्या तुलनेत ७० टक्के सोन्याची विक्री होईल, असा विश्वास आहे.