नवी दिल्ली - टाळेबंदीत दैनंदिन वस्तुंच्या (एफएमसीजी) उद्योगाची उलाढाल दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत आयटीसीने सनराईज फूड कंपनीची अंदाजित १ हजार ८०० कोटी ते २ हजार कोटी रुपयांनी खरेदी केली आहे.
सनराईज ही पूर्व भारतात मसाल्यांच्या बाजारपेठेत आघाडीची कंपनी असल्याचे आयटीसीने म्हटले आहे. या कंपनीला गेल्या ७० वर्षांचा ब्रँडचा वारसा आहे.
हेही वाचा-एअर एशिया इंडियाचे २१ शहरांसाठी विमान तिकिट बुकिंग सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीनेएकनिष्ठ ग्राहकांची फ्रँचाईजी विकसित केली आहे. तर वेगवेगळ्या प्रादेशिक चवींची उत्पादने कंपनीकडून देण्यात येतात. ही कंपनी ताब्यात घेण्यामागे एफएमसीजी उद्योगात आयटीसीचे प्रमाण वाढविणे असल्याचे आयसीटीने म्हटले आहे.
हेही वाचा-सोन्याची आयात 'फिक्कट'; सलग पाचव्या महिन्यात १०० टक्क्यांची घसरण