हैदराबाद : ज्यांचे उत्पन्न चांगले आहे, तसेच ज्यांना पैसे दुप्पट करायचे आहेत. परंतु, अनेक जण चांगला परतावा मिळवण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी या संभ्रमात असतात. भारतीय सोन्याचे शौकीन आहे आणि ते नेहमी सोन्यात चांगल्या गुंतवणुकीच्या (Good investment in Gold) शोधात असतात. शिवाय, प्रत्येकाला त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळावा (Higher Return Investments) अशी इच्छा असते. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात? धोकादायक प्रकारच्या गुंतवणुकीत हे शक्य आहे का ? यावर तज्ञ (Expert Advice) काय म्हणतात ते पाहूया.
मी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. किमान वार्षिक परतावा 14 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कोणत्या योजना निवडल्या पाहिजेत? मी किती काळ गुंतवणूक करावी ?असे अरुणने विचारले.
"उच्च परतावा फक्त जोखमीच्या गुंतवणुकीतच शक्य आहे. तुम्ही किती जोखीम सहन करू शकता ते पहा. इक्विटी-आधारित गुंतवणुकीसह, काही प्रकरणांमध्ये परतावा 14 टक्क्यांपेक्षा जास्त असतो. जेव्हा गुंतवणूक किमान 7 -10 वर्षे पर्यंत चालू राहते, तेव्हाच शक्य आहे. अल्पकालीन चढउतार जास्त आहेत. वेळेवर गुंतवणूक करत राहिल्यास तुम्ही दीर्घकाळात १२-१५ टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा करू शकता. यासाठी तुम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे वैविध्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड पहावे,” असा सल्ला तुम्मा बलराज देतात.
"मला माझ्या आईच्या नावावर असलेल्या ज्येष्ठ नागरिक बचत खात्यात 5 लाख रुपये जमा करायचे आहेत. हे अधिक फायदेशीर आहे का? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आणि दरमहा ठराविक रक्कम घेणे चांगले होईल का?" असे स्वप्ना विचारते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळू शकते. दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. सध्याच्या परिस्थितीत, मुदत ठेवी आणि कर्ज निधी जास्त परतावा देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा करा. ही योजना पाच वर्षे सुरू ठेवावी. कलम ८०सी अंतर्गत ही गुंतवणूक करसवलत आहे. मिळविलेले व्याज एकूण उत्पन्नासह दर्शविले जाते आणि लागू स्लॅबवर आधारित करपात्र आहे.