नवी दिल्ली -भारतीय विमा नियामक मंडळाने (आयआरडीएआय) मंगळवारी वैद्यकीय उपचारांवर सवलत देऊन आरोग्य योजना विकल्याचा दावा करणाऱ्या अनधिकृत संस्थांविरूद्ध लोकांना सतर्क केले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले की, असे लक्षात आले आहे की काही अनधिकृत संस्था वैद्यकीय उपचारांवर किंवा रोगनिदानविषयक चाचण्यांवर सूट देत आहेत. तसेच आरोग्य योजनांची विक्री करीत असल्याचा दावा करीत आहेत.
एका सार्वजनिक नोटीसमध्ये नियामकाने म्हटले आहे की, केवळ आयआरडीएआय-नोंदणीकृत विमा कंपन्या किंवा त्यांचे अधिकृत एजंट आणि मध्यस्थ विमा उत्पादने विकू शकतात. अशी सेवा जे अनधिकृत व्यक्तींकडून किंवा संस्थांकडून घेतात त्यांच्या स्वत: च्या जोखमीवर असे करणे आवश्यक आहे, असेही नियामक मंडळाने म्हटले आहे.