महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पाचव्या सत्रातही घसरण; शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ९.५६ लाख कोटी पाण्यात! - शेअर बाजार गुंतवणूकदार नुकसान न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५३५.५७ अंशाने घसरून ४६,८७४.३६ वर स्थिरावला. गेल्या पाच सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २,९१७.३६ अंशाने घसरण झाली आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jan 28, 2021, 10:39 PM IST

नवी दिल्ली - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग पाचव्या सत्रात घसरला आहे. त्याचा शेअर बाजार गुंतवणुकदारांना फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांनी ९,५६,५९७.८२ कोटी रुपये गमाविले आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५३५.५७ अंशाने घसरून ४६,८७४.३६ वर स्थिरावला. गेल्या पाच सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २,९१७.३६ अंशाने घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ९,५६,५९७.८२ कोटी रुपयांवरून १,८८,१३,९७४.७५ कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचा-जाणून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी महाराष्ट्राच्या अपेक्षा

रिलेगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (रिसर्च) अजित मिश्रा म्हणाले की, पाचव्या सत्रात बाजारामधील व्यवहारांवर दबाव होता. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीमुळे आज शेअर बाजार खुला होताना निर्देशांक घसरला होता. दुपारनंतर शेअर बाजार सावरण्याची स्थिती झाली होती.

हेही वाचा-अर्थसंकल्पात सार्वजनिक कंपन्यांच्या खासगीकरणाकरता ब्ल्यू प्रिंट सादर होण्याची शक्यता

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

गुरुवारी शेअर बाजारात एचयूएलचे सर्वाधिक ३.६५ टक्क्यांनी शेअर घसरले. त्यापाठोपाठ मारुती, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, कोटक बँक आणि इंडसइंड बँकचे शेअर घसरले. एसबीआय, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर हे ६.१६ टक्क्यापर्यंत वधारले. मुंबई शेअर बाजारात आयटी, एफएमसीजी, टेक, ऑटो आणि आरोग्यक्षेत्रातील कंपन्यांचे शेअर २.०७ टक्क्यांपर्यंत घसरले. तर ऑईल, गॅस, दूरसंचार, बँकेक्स आणि ग्राहकोपयोगी उत्पादन कंपन्यांचे शेअर वधारले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीओ) भारतीय भांडवली बाजारात सोमवारी ७६५.३० कोटी रुपयांचे शेअर विकल्याची माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून दिसून आली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details