महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गुंतवणूकदारांची 'दिवाळी'; शेअर बाजाराच्या विक्रमानंतर संपत्तीत एकूण २ लाख कोटींची वाढ - शेअर बाजार गुंतवणूकदार न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७०.४.३७ अंशाने वधारून ४२,५९७.४३ वर स्थिरावला. तर दिवसा ४२,६४५.३३ अंशावर पोहोचला होता. शेअर बाजाराचा हा आजपर्यंतचा सर्वाधिक निर्देशांक राहिला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Nov 9, 2020, 7:54 PM IST

नवी दिल्ली- शेअर बाजार निर्देशांकाने विक्रमी टप्पा गाठल्याने गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण २ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीनंतर मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक आज वधारला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७०.४.३७ अंशाने वधारून ४२,५९७.४३ वर स्थिरावला. तर दिवसा ४२,६४५.३३ अंशावर पोहोचला होता. शेअर बाजाराचा हा आजपर्यंतचा सर्वाधिक निर्देशांक राहिला आहे. निफ्टीचा निर्देशांक १२,४६१.०५ वर पोहोचला होता. हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक वधारल्यानंतर सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य वाढले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बिडेन यांची निवड झाल्यानंतर तत्काळ प्रतिसाद म्हणून शेअर बाजाराचा निर्देशांक वाढल्याचे रिलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.

शेअर बाजारात असे होते चित्र-

  • मुंबई शेअर बाजारात ३० पैकी २८ सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर वधारले. यामध्ये इंडसइंडचे सर्वाधिक ४.९५ टक्क्यांनी शेअर वधारले.
  • भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, अ‌ॅक्सिस बँक आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले.
  • आयटीसी आणि मारुतीचे शेअर घसरले.
  • बीएसई टेलिकॉम, बँकेक्स, उर्जा, धातू, वित्त, ग्राहकोपयोगी उत्पादने या उत्पादनांचे शेअर ३.८१ टक्क्यांहून अधिक वधारले.
  • आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर अंशत: घसरले.
  • मुंबई शेअर बाजारातील १,४८५ कंपन्यांचे शेअर वधारले. तर १ हजार २०६ कंपन्यांचे शेअर घसरले. मात्र, १९१ कंपन्यांचे शेअर स्थिर राहिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details