नवी दिल्ली- शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 3.7 लाख कोटींची आज घसरण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाली आहे. त्याचा गुंतवणुकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे आज 3,71,883.82 कोटी रुपयांवरून 2,00,26,498.14 कोटी रुपये भांडवली मूल्य झाले आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 19 फेब्रुवारीला 2,03,98,381.96 कोटी रुपये होते.
मुंबई शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी आज घसरण झाली आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजार 1,145 अंशाने घसरून 49,744.32 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 306.05 अंशाने घसरून 14,675.70 वर स्थिरावला.