नवी दिल्ली- मुंबई शेअर बाजाराच्या पडझडीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १.३७ लाख कोटींची घट झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४८७.४३ अंशाने घसरून ५०,७९२.०८ वर स्थिरावला. शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १,३७,५९०.६२ कोटी रुपयांनी घसरून २,०७,८९,०६२.८४ कोटी रुपये झाले आहे. रोख्यांवरील परताव्याचे प्रमाण वाढल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधक प्रमुख विनोद नायर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्याने मागणीत कमालीची घट