नवी दिल्ली -शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांनी ५.५५ लाख कोटी रुपये चार दिवसात गमाविले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण देशात वाढत असल्याने शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या दरात आज मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर बँकिंगचे शेअर घसरले आहे. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६२.३४ अंशाने घसरून निर्देशांक ४९,८०१.६२ वर स्थिरावला. गेल्या चार दिवसात शेअर बाजाराचा निर्देशांक १,४७७.८९ अंशाने घसरला आहे. तर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ५,५५,४००.५२ कोटी रुपयांवरून २,०३,७१,२५२.९४ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा-नोकिया १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार; 5 जी तंत्रज्ञानावर करणार लक्ष्य