महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग तीन दिवस शेअर बाजारात तेजी; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ९.४१ लाख कोटींची वाढ - market capitalisation of BSE listed companies

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१४८ अंशाने वधारून निर्देशांकाने ५१,००० चा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ३२६.५ अंशाने वधारून १५,२०० टप्पा गाठला आहे.

Investor wealth
शेअर बाजार गुंतवणुकदार संपत्ती

By

Published : Mar 3, 2021, 7:07 PM IST

नवी दिल्ली - सलग तीन दिवस शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण ९.४१ लाख कोटींची वाढ झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१४८ अंशाने वधारून निर्देशांकाने ५१,००० चा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ३२६.५ अंशाने वधारून १५,२०० टप्पा गाठला आहे.

हेही वाचा-साखरेच्या उत्पादनात फेब्रुवारी २०२०-२१ मध्ये २० टक्क्यांची वाढ

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ३,६९,१७०.७२ कोटी रुपयांवरून २,१०,२२,२२७.१५ कोटी रुपये झाले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १ मार्चला ९,४१,१३१.४२ कोटी रुपयांवरून २,१०,२२,२२७.१५ कोटी रुपये झाले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीन दिवसांमध्ये २,३४४.६६ अंशाने वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ७१६.४५ अंशाने वधारला आहे.

हेही वाचा-पेपल भारतामध्ये १ हजार अभियंत्यांना देणार नोकऱ्या

ABOUT THE AUTHOR

...view details