नवी दिल्ली - शेअर बाजार सावरल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.८२ लाख कोटींची वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजार ६९२.७९ अंशांनी वधारून २६,६७४.०३ वर स्थिरावला आहे.
भांडवली बाजारामधील सूचिबद्ध कंपन्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. कंपन्यांचे भांडवली मूल्य १,८२,७६९.९२ कोटी रुपयांवरून १,०३,६९.७०६.२० कोटी रुपये झाले आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सोमवारी ३,९३४.७२ अंशांनी घसरून २५,९८१.२४ वर स्थिरावला होता. रिलीगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधक) अजित मिश्रा म्हणाले, मागील काही सत्रातील घसरणीनंतर मुंबई शेअर बाजारात शेअरची चांगली खरेदी दिसून आली आहे. जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थिती आणि केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर होणार असल्याने मुंबई शेअर बाजारात सकारात्मक चित्र दिसून आले.