नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावल्याने गुंतवणुकदारांचा फायदा झाला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत चालू वर्षात ३२.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कोरोना महामारीचा जगभरातील लोकांचे जीवन आणि जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना आशेचा किरण दाखविला आहे. चालू आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १५.७ टक्क्यांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी-विक्रीची उलाढाल झाली.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह अॅमेझॉनवर कारवाईचे ई़डीला केंद्राकडून आदेश
वर्षभरात शेअर बाजाराचा निर्देशांकात चढ-उतार राहिला आहे. २४ मार्चला शेअर बाजाराचा निर्देशांक घसरून २५,६३८.९ वर स्थिरावला होता. हा वर्षभरातील शेअर बाजाराचा नीचांक राहिला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराने ४७,८९६.९७ हा सर्वोच्च निर्देशांक गाठला. संपूर्ण वर्षभरात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची संपत्ती ३२,४९,६८९.५६ कोटी रुपयांवरून १,८८,०३,५१८.६० कोटी रुपये झाली आहे.
हेही वाचा-इंग्लंडकडून अॅस्ट्राझेनेका लसीला मंजुरी ही सकारात्मक बातमी-सीरम