महाराष्ट्र

maharashtra

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची वाढ

By

Published : Feb 2, 2021, 3:05 PM IST

Updated : Feb 2, 2021, 3:30 PM IST

केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी १ (फेब्रुवारी) सादर झाल्यानंतर गुंतवणुकदारांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खुला होताना निर्देशांक १,५५३.८७ अंशाने वधारून ५०,१५४.४८ वर पोहोचला.

शेअर बाजार
शेअर बाजार

नवी दिल्ली - अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोमवारपासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. गुंतवणुकदारांच्या सपंत्तीत मंगळवारी ३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीनंतर सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प अभूतपूर्व असल्याची अर्थतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी १ (फेब्रुवारी) सादर झाल्यानंतर गुंतवणुकदारांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खुला होताना निर्देशांक १,५५३.८७ अंशाने वधारून ५०,१५४.४८ वर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची संपत्ती आज सकाळी ३,०४,१६९.३ कोटी रुपयांवरून १,९५,५०,८८३ कोटी रुपये झाली आहे.

शेअर बाजारात तेजी कायम

हेही वाचा-अर्थसंकल्पाला गुंतवणुकदारांचा सकारात्मक प्रतिसाद; शेअर बाजारात १५०० अंशाने उसळी

गुंतवणुकदारांच्या संपत्तीत सोमवारी ६.३४ लाख कोटी रुपयांची भर

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी २,३१४.८४ अंशाने वधारून ४८,६००.६१ वर स्थिरावला. गुंतवणुकदारांच्या संपत्तीत सोमवारी ६.३४ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

हेही वाचा-Budget 2021 : प्राप्तीकर मर्यादा जैसे थे, विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी खैरात

या आहेत शेअर बाजार विश्वलेषकांच्या प्रतिक्रिया

आनंद राठी या कंपनीने म्हटले की, केंद्रीय अर्थसंकल्पात प्रोत्साहन देण्याकरता ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. मात्र, आरोग्य, पायाभूत क्षेत्र, वित्तीय क्षेत्र आणि निवडक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतीय शेअर बाजारासाठी अर्थसंकल्प हा सकारात्मक राहिला आहे. कोटक सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप हंसराज म्हणाले की, महामारीच्या काळात हा चांगला अर्थसंकल्प आहे. करात वाढ नाही, तसेच दोन सार्वजनिक बँकांमध्ये निर्गुंतणूक करण्यात येणार आहे. सार्वजनिक बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांचे भांडवली अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा-

  • ७५ वर्षांवरील पेन्शनधारकांना आयटी रिटर्न भरण्यापासून सुट
  • आरोग्य क्षेत्रासाठी २.२३ लाख कोटींची तरतूद
  • नव्या आरोग्य योजनेसाठी ६४ हजार कोटींच्या तरतूदीची घोषणा
  • कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद
  • मिशन पोषण २.० चा शुभारंभ करणार
  • रस्ते मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटींची तरतूद
  • मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद
  • रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद
  • लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद
  • सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद
  • डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन (DFI)ची स्थापना करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद
Last Updated : Feb 2, 2021, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details