नवी दिल्ली - महामारी 'कोविड-१९' चा शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात ६.२५ लाख कोटी रुपये गमाविले आहेत. शेअर बाजारात सकाळच्या सत्रात २,१८२.४१ अंशांनी घसरण झाली आहे.
कोविड-१९ च्या वाढत्या प्रसाराने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याची शेअर बाजार गुंतवणूकदारांनी भीती आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री करण्यात आली आहे. शुक्रवारनंतर मुंबई शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली आहे. बीएसई-३० मध्ये सूचिबद्ध असलेल्या इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर ९.३ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.