नवी दिल्ली - शेअर बाजार निर्देशांकातील घसरणीचा गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत आज ३.२७ लाख कोटींची घट झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८७१.१३ अंशाने घसरून ४९,१८०.३१ वर स्थिरावला. या घसरणीनंतर शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ३,२७,९६७.७१ कोटी रुपयांवरून २,०२,४८,०९४.१९ कोटी रुपये झाले आहे.
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शेअर बाजार अस्थिर राहिला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा-वाधवान पिता-पुत्रांचा आणखीन कारनामा उघडकीस; सीबीआयकडून गुन्हा दाखल