महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इन्फोसिसच्या नफ्यात २३.७ टक्क्यांची वाढ; मिळविले ४,४६६ कोटी रुपये

इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरीची  माहिती  शेअर बाजाराला दिली आहे. इन्फोसिसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविण राव यांनी नोकऱ्या सोडून जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले.

Infosys
इन्फोसिस

By

Published : Jan 10, 2020, 7:22 PM IST

बंगळुरू - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनी इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीत २३.७ टक्के नफ्याची नोंद केली आहे. कंपनीला ४,४६६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

गतवर्षी इन्फोसिसने ३,६१० कोटी रुपये निव्वळ नफा कमविला होता. इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. इन्फोसिसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविण राव यांनी नोकऱ्या सोडून जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले.

हेही वाचा-चंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून मनीलाँड्रिगप्रकरणी कारवाई

तिसऱ्या तिमाहीत महसुलामध्ये ७.९ टक्क्यांची वाढ होवून २३,०९२ कोटी रुपये महसूल झाला आहे. तर मागील वर्षात तिसऱ्या तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये २१,४०० कोटींचा कंपनीने महसूल मिळविला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details