महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खाद्यपदार्थांच्या उच्च दरांमुळे सप्टेंबर महिन्याचा घाऊक महागाई निर्देशांक वाढला - घाऊक किमतींवर आधारित महागाईचा वार्षिक दर

डाळी महागल्या आहेत. या कालावधीत भाजीपाल्याचे दर भडकले असून 36.54 टक्के इतक्या उच्च स्तरावर आहेत. बटाट्याच्या किंमती एका वर्षाच्या तुलनेत 107.63 टक्क्यांनी जास्त आहेत. कांद्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

घाऊक महागाई निर्देशांक
घाऊक महागाई निर्देशांक

By

Published : Oct 14, 2020, 2:15 PM IST

नवी दिल्ली - खाद्यपदार्थांचे उच्च दर, प्राथमिक वस्तू आणि उत्पादित वस्तूंच्या उच्च दरांमुळे सप्टेंबरमधील घाऊक महागाई दरात (डब्ल्यूपीआय) तीव्र वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून घाऊक किमतींवर आधारित महागाईचा वार्षिक दर ऑगस्टच्या 0.16 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 1.32 टक्क्यांवर गेला.

वर्षाकाठीच्या आधारावर वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या घाऊक किंमत निर्देशांकातील आकडेवारीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीत केवळ 0.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ऑगस्टमध्ये 8.17 टक्के होता. पुनरावलोकनाच्या कालावधीत धान्याच्या किंमतीत घट झाली आहे. डाळी महागल्या आहेत. या कालावधीत भाजीपाल्याचे दर भडकले असून 36.54 टक्के इतक्या उच्च स्तरावर आहेत. बटाट्याच्या किंमती एका वर्षाच्या तुलनेत 107.63 टक्क्यांनी जास्त आहेत. कांद्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details