मुंबई - शेअर बाजार खुला होताना ४०० अंशांनी वधारलेला निर्देशांक पुन्हा घसरणीच्या दिशेने जावू लागला. यावेळी एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपन्यांचे शेअर वधारल्याने शेअर बाजाराची घसरण टळली.
खनिज तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरून प्रति बॅरल १२ डॉलरपर्यंत पोहोचले. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ५९.२८ अंशांनी वधारून ३१,६४८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ४.९० अंशांनी घसरून ९,२६१.८५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एचडीएफसी ट्विन्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले. आयटी कंपन्यांचेही शेअर वधारले. एचडीएफसी बँकेचे शेअर ४ टक्क्यापर्यंत वधारले. इन्फोसिसचे शेअर ३ टक्क्यांहून वधारले आहेत.