टेक डेस्क - चीनची स्मार्टफोन कंपनी हुआवे भारतात येत्या काही महिन्यात फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा मोबाईल कंपनीने वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला होता.
'Huawei Mate X' फोल्डेबल स्मार्टफोन भारतात होणार लाँच - 5g
चीनची स्मार्टफोन कंपनी हुआवे भारतात येत्या काही महिन्यात फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा मोबाईल कंपनीने वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला होता.
या फोनचा डिस्प्ले फोल्ड होतो. कंपनीने याची किंमत २,२९९ युरो (१ लाख ८० हजार रुपये) ठेवली आहे. टॅक्समुळे याची किंमत भारतात थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. Huawei Mate X भारतात ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे.
Huawei Mate X चे फिचर्स
- 5G कनेक्टिव्हिटी (5G नेटवर्क करू शकणार यूज)
- ८ इंचीचा फ्लेग्जिबल OLED डिस्प्ले
- फोल्ड केल्यानंतर डिस्प्ले ६.६ इंचीचा होतो
- दुसऱ्या बाजूने ६.३८ इंची फोल्ड केल्यानंतर
- Kirin 980 प्रॉसेसर
- बॅटरी 4,500mAh
- प्रायमरी कॅमेरा ४० मेगापिक्सेल, दुसरा १६ मेगापिक्सेल, तिसरा ८ मेगापिक्सेल
- 55W सुपरचार्ज अडॅप्टर
- 8 GB रॅमसह ५१२ GB इन्टर्नल स्टोरेज