मुंबई- सोन्याच्या दरवाढीचा दागिने उद्योगाला मोठा फटका बसला आहे. वाढलेल्या सोन्याच्या दरामुळे ग्राहकांकडून दागिन्यांची मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून वर्ष २०१९-२०२० मध्ये दागिन्यांच्या मागणीत ६ ते ८ टक्के घट होईल, असा अंदाज आहे.
गेल्या पाच वर्षात सोन्याची सर्वात कमी मागणी वर्ष २०१९ मध्ये नोंदविण्यात आली आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सोन्याच्या खरेदीवर नियमन करण्यात आले आहे. तसेच गुंतवणुकीमधून कमी परतावा मिळत असल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे इक्रा या पतमानांकन संस्थेने अहवालात म्हटले आहे.