महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महागाईचा दणका: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ३ रुपयांनी वाढ - Diesel rate

उत्पादन शुल्क वाढल्याने आपसुकच पेट्रोल व डिझेलचे दर वाढणार आहेत. मात्र, जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर आणखी घसरले तर पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रित प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे

excise duty on petrol
पेट्रोल डिझेल दरवाढ

By

Published : Mar 14, 2020, 12:11 PM IST

Updated : Mar 14, 2020, 12:57 PM IST

नवी दिल्ली - जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलला प्रति लिटर ३ रुपये जादा उत्पादन शुल्क लागू होणार आहे.

पेट्रोलवरील विशेष उत्पादन शुल्क प्रति लिटरला २ रुपये ते ८ रुपये वाढले आहे. तर डिझेलवरील विशेष उत्पादन शुल्क प्रति लिटरला ४ रुपयांनी वाढल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. पेट्रोलवरील रस्ते उपकर (रोड सेस) हा प्रति लिटर १ रुपयांनी तर डिझेलवरील उपकर हा प्रति लिटर १० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क वाढल्याने आपसुकच पेट्रोल व डिझेलचे दर वाढणार आहेत. मात्र, जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर आणखी घसरले तर पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रित प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरलेले आहेत.

महाराष्ट्रातील जनतेला दरवाढीचा दुहेरी फटका-

महाविकासआघाडी सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवरील उपकरात प्रति लिटर १ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याकडून वाढलेला उपकर आणि केंद्र सरकारने वाढविलेले उत्पादन शुल्क अशा दुहेरी दरवाढीच्या फटक्याने महाराष्ट्रातील जनता होरपळणार आहे.

Last Updated : Mar 14, 2020, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details