नवी दिल्ली -केंद्र सरकार आयातीचा कांदा बाजारात प्रति किलो २२ ते २३ रुपये किलो या दराने विकण्यावर विचार करत आहे. हा दर सध्याच्या दराहून ६० टक्के कमी आहे. आयात केलेला कांदा बंदरावर सडण्याची भीती असल्याचे सूत्राने सांगितले.
सध्या, केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना प्रति किलो ५८ रुपये दराने कांदा विकण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारांना कराव्या लागणाऱ्या वाहतुकीचा खर्चही उचलण्याची केंद्र सरकारने तयारी दर्शविली आहे. बाजारातील कांद्याचे दर नियंत्रण आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१९ मध्ये १.२ लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता.