नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या एचसीक्यू गोळ्यांचे बाजारपेठेतील प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारने १५.४० कोटी हायड्रोक्सिक्लोक्विन (एचसीक्यू) गोळ्यांचा एप्रिलपर्यंत देशात पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाशी लढा: सरकार १५.४० कोटी एचसीक्यू गोळ्यांचा देशात करणार पुरवठा - एचसीक्यू
देशात सामान्यत: २ ते २.५ कोटी एचसीक्यू गोळ्यांची गरज असते. मात्र, सरकारने एप्रिलमध्ये किरकोळ औषधी विक्रेत्यांना ७.५ कोटी एचसीक्यू गोळ्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने एचसीक्यू गोळ्यांचा ६२ देशांना पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. देशात सामान्यत: २ ते २.५ कोटी एचसीक्यू गोळ्यांची गरज असते. मात्र, सरकारने एप्रिलमध्ये किरकोळ औषधी विक्रेत्यांना ७.५ कोटी एचसीक्यू गोळ्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर केंद्र सरकारने केलेल्या एकूण ६.७५ कोटी गोळ्यांच्या मागणीपैकी १.५ कोटी गोळ्या या महिन्यात देणार आहेत. तर ८० लाख गोळ्या विविध राज्यांना देण्यात येणार आहेत. तर ४५ लाख गोळ्या इएसआयसी आणि बीपीपीआयसारख्या संस्थांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात दारू विक्री सुरू करण्यावर मद्यनिर्मिती उद्योगाची 'ही' आहे भूमिका