नवी दिल्ली-सुवर्णरोख्यावरील योजनेत गुंतवणूक केल्यास केंद्र सरकारकडून सवलत दिली जाणार आहे. ही सवलत डिजीटल पद्धतीने ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना दिली जाणार आहे.
सुवर्ण रोख्यावरील खरेदीवर प्रति ग्रॅम ५० रुपये सवलत देण्यावर केंद्र सरकार आरबीआयशी सल्लामसलत करत आहे. सुवर्णरोख्याची योजना २८ डिसेंबरला खुली होणार आहे. या योजनेत सोन्याचा दर प्रति ग्रॅम ५ हजार रुपये आहे. गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम ४,९५० रुपये खरेदी करता येणार आहे. सार्वभौम सोने रोखे २०२०-२१ (श्रेणी ११) ही २८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान सुरू राहणार आहे. तर सेटलमेंट डेट ही ५ जानेवारी २०२१ असणार आहे.
हेही वाचा-मेक इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता सरकारकडून ४० हजार कोटींची कंत्राटे रद्द