नवी दिल्ली - सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा ८१६ रुपयांनी वाढून ४९,४३० रुपये झाले आहेत. जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८, ६१४ रुपये झाला होता.
बाजारात चांदीचीही मागणी वाढली आहे. चांदीचा दर प्रति किलो ३,०६३ रुपयांनी वाढून ६४,३६१ रुपये आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ८९६ रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-जिओ ५जी सेवा पुढील वर्षी सुरू करणार -मुकेश अंबानी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,८६४ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २४.५२ डॉलर आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कमोडिटी रिसर्चचे व्हीपी नवनीत दमानी म्हणाले, की कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना सोन्याचे दर वाढले आहेत. विविध मध्यवर्ती बँकांच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाचा अर्थव्यवस्थावर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा-भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांसह वाहतूक क्षेत्र होणार नाही सहभागी