महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,८०५ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २५.९३ डॉलर आहेत.

सोने दर
सोने दर

By

Published : Jul 9, 2021, 6:36 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ४५१ रुपयांनी कमी होऊन ४६,८४४ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने देशातही सोन्याचे दर उतरले आहेत.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४७,२९५ रुपये होता. चांदीचे दर प्रति किलो ५५९ रुपयांनी कमी होऊन ६७,४६५ रुपये आहेत. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ४ पैशांनी वधारून ७४.६७ रुपये आहे.

हेही वाचा-ऑक्सिजन उपलब्धतेवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

या कारणाने सोन्याच्या दरात घसण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,८०५ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २५.९३ डॉलर आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की सलग तीन सत्रात सोन्याच्या किमती वधारल्या होत्या. डॉलरचे किंचत घसरलेले मूल्य आणि अमेरिकेच्या बाँडमधील व्याजदरातील घसरण या कारणांनी सोन्याचे दर वधारले आहेत.

हेही वाचा-NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे

सोन्याच्या किमती अशा ठरतात!

झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात. तर डॉलरचे मूल्य घसरल्यानंतर सोन्याच्या किमती वाढायला लागतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काही संकेत दिल्यानंतर अलीकडे सोन्याच्या किमती घसरल्याचे कानथेटी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

हेही वाचा-ZIKA VIRUS आणखी १४ जणांना केरळमध्ये लागण

ABOUT THE AUTHOR

...view details