महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या किमतीने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; जाणून घ्या वाढलेले दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर ९५३ रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

Gold rate
सोने दर

By

Published : Feb 24, 2020, 4:05 PM IST

नवी दिल्ली - भारतीयांचे आकर्षण असलेल्या सोन्याच्या किमतीमध्ये आज प्रति तोळा ९५३ रुपयांनी वाढ झाली आहे. रुपयाची घसरण आणि जागतिक बाजारातील वाढलेल्या दर या कारणांनी सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सेक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४३,५१९ रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ५८६ रुपयांनी वाढून ४९,९९० रुपये झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर ९५३ रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-ट्रम्प यांचा भारत दौरा केवळ व्यापारच नव्हे तर रणनीतीसाठीही महत्त्वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने हे प्रति औंस १,६८२ डॉलरने वाढले आहेत. तर चांदीचे दर प्रति औंस हे १८.८० डॉलरने वाढले आहेत. कोरोना चीनसह दक्षिण कोरिया, मध्यपूर्व आणि इटलीमध्ये वाढत आहे. त्यानंतर सोन्याचे दर वाढत असल्याकडेही पटेल यांनी लक्ष वेधले आहेत.

हेही वाचा-सोने महागले! जाणून घ्या, कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details