महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दिपोत्सवात यंदा सोन्याची मागणी सुमारे 25 टक्क्यांनी वाढणार- सराफ व्यवसायिकांना अपेक्षा - मलबार गोल्ड आणि डायमंड्स

पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की नवरात्रीपासून बाजारात मागणी वाढली आहे. 2019 च्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के व्यवसायात वाढ होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असणार आहे.

सोने मागणी
सोने मागणी

By

Published : Nov 3, 2021, 6:59 AM IST

मुंबई - येत्या दिवाळीत सोन्याला पुन्हा झळाळी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनापूर्वीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत 30 टक्क्यांहून वाढ होईल, अशी सराफ व्यवसायिकांना अपेक्षा आहे. वेगाने सुधारलेली अर्थव्यवस्था व सोन्याच्या किमतीमधील घसरण या कारणाने सोन्याच्या विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गतवर्षी कोरोना आणि टाळेबंदीमुळे देशभरात उद्योग, व्यापार आणि दुकाने ठप्प बंद पडले होते. त्यामुळे दिवाळी आणि धनत्रयोदशी 2020 ला रत्ने आणि दागिने उद्योगांचे मोठे नुकसान झाले होते.

रत्ने आणि दागिने विक्रीत वाढ होणार-

ऑल इंडिया जेम आणि ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन आशिष पेठे म्हणाले, की चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत, श्राद्ध पक्षापासून सोने विक्रीत वाढ झाल्याचे आम्ही अनुभवत आहोत. प्रत्यक्षात या काळात सोने विक्री होत असते. मात्र, सोन्याच्या किमती घसरण होऊन सोने प्रति तोळा 42,500 रुपये राहिले आहे. गेल्या काही महिन्यांत जीएसटीचे संकलन वाढलेले आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेले विवाहसमारंभ यंदा होणार आहेत. त्यामुळे रत्ने आणि दागिने विक्रीत वाढ होणार आहे. ग्राहकांची सकारात्मक मानसिकता आणि बाजारातील चिन्हे पाहता यंदा गतवर्षीच्या तुलनेत देशभरात 20 ते 25 टक्के विक्री वाढेल, अशी अपेक्षा आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा 56 हजारापर्यंत पोहोचली होती. तर शनिवारी सोन्याचे दर प्रति तोळा 49,200 रुपये राहिला आहे.

जुलै ते सप्टेंबरमध्ये 58 टक्क्यांनी सोन्यांच्या मागणीत वाढ

जागतिक सुवर्ण परिषद, भारतचे सीईओ (World Gold Council) सोमासुंदरम पी. आर. म्हणाले, की कोरोना लसीकरणाचे वाढलेले प्रमाण आणि संसर्गाचे कमी झालेले प्रमाण या कारणांनी सोन्याची मागणी वाढली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी जुलै ते सप्टेंबरमध्ये 58 टक्क्यांनी वाढून 96.2 टन झाली आहे. तर गुंतवणुकीसाठी सोन्याची बिस्कीटे आणि नाण्यांच्या मागणीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्षात मान्सून आणि पितृपक्षामुळे या कालावधीत ग्राहकांकडून सोन्याची खरेदी करण्याचे टाळले जाते. सोन्याच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे कल दाखविला आहे. कोरोनाच्या काळातील निर्बंद हळूहळू कमी झाल्याने देशभरात किरकोळ सोने खरेदीची मागणी ही कोरोनापूर्वीच्या स्थितीएवढी झाली आहे. आगामी सण आणि लग्नसराई निमित्त सोन्याच्या खरेदीकरता उत्साह दिसत आहे. कोरोनाच्या काळात यंदा सर्वाधिक सोने खरेदी होईल, असा अंदाज आहे.

तिसली लाट आली नाही तर बाजारपेठेत सकारात्मक परिणाम

पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की नवरात्रीपासून बाजारात मागणी वाढली आहे. 2019 च्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के व्यवसायात वाढ होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यापर्यंत लग्नसराई आहे. त्यामुळे उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. जर कोरोनाची तिसली लाट आली नाही तर बाजारपेठेत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

सोने विक्रीत कमीत कमी 35 ते 40 टक्के वाढ

मलबार गोल्ड आणि डायमंड्सचे चेअरमन अहमद एम. पी. म्हणाले, की सोन्याच्या दागिन्यांची मागणी सणांमध्ये चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. व्हीएचपी ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे म्हणाले, की उद्योग हे आगामी सणांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे खूप अपेक्षा आहेत. कोरोनाचे ढग कमी होत असताना ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. यंदा सोने विक्रीत कमीत कमी 35 ते 40 टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details