महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने प्रति तोळा ४५४ रुपयाने महाग; चांदीच्या दरातही वाढ - सोने दर न्यूज

रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यानंतर सोन्यासह चांदीचे दर वाढले आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Oct 6, 2020, 5:00 PM IST

नवी दिल्ली- सोन्याचे दर प्रति तोळा ४५४ रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर सोन्याचा दर नवी दिल्लीत प्रति तोळा ५१ हजार ८७९ रुपये आहे. रुपयाची घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात बाजार बंद होताना सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार ४२५ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो ७५१ रुपयांनी वाढून ६३ हजार १२७ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६२ हजार ३७६ रुपये होता.

हेही वाचा-अ‌ॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल १७ ऑक्टोबरपासून होणार सुरू

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की दिल्लीत २४ कॅरट सोन्याचा दर ४५४ रुपयांनी वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी घसरून ७३.४६ वर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर किंचित घसरून प्रति औंस १ हजार ९१० डॉलर आहे. तर चांदीचा दर जवळपास जैसे थे म्हणजे २४.२५ डॉलर आहे.

हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलचे दर 'जैसे थे'; कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा परिणाम

ABOUT THE AUTHOR

...view details