महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सणाच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी; प्रति तोळा ३३० रुपयाने महाग - एचडीएफसी सेक्युरिटीज

पितृपक्ष-श्राद्ध कालावधी २८ सप्टेंबरला संपल्यानंतर सोन्याची मागणी वाढेल, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे देवार्ष वकील यांनी व्यक्त केला.

संग्रहित - सोने

By

Published : Sep 24, 2019, 6:55 PM IST

नवी दिल्ली - दसरा-दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोन्याचे दर प्रति तोळा ३३० रुपयाने वाढून ३९,०२० रुपये झाला आहे. सणानिमित्त मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सेक्युरिटीजने म्हटले आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वाढले आहे. चांदीचा दर प्रति किलो ७३० रुपयाने वाढला आहे. मागील बाजारभावात चांदीचा भाव प्रति किलो हा ४७,९९० रुपये होता.

हेही वाचा-आरबीआयच्या निर्बंधाने पीएमसी बँकेचे ग्राहक चिंताग्रस्त; खोपोली, डोंबिवलीसह नवी मुंबईतील शाखेत गर्दी

पितृपक्ष-श्राद्ध कालावधी २८ सप्टेंबरला संपल्यानंतर सोन्याची मागणी वाढेल, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे देवार्ष वकील यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर स्थिर राहिले आहेत.

हेही वाचा-'कॉर्पोरेट कर कमी केल्याने भारत विदेशी गुंतवणुकीकरता आकर्षणाचे स्थान ठरेल'

ABOUT THE AUTHOR

...view details