महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर - सोने दर न्यूज

सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर वाढले आहेत. चांदी प्रति किलो 1 हजार 306 रुपयांनी वाढून 69 हजार 820 रुपये झाले आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 68,514 रुपये होता.

संग्रहित - सोने
संग्रहित - सोने

By

Published : Aug 17, 2020, 5:42 PM IST

नवी दिल्ली – सोन्याचा दरात प्रति तोळा 340 रुपयांनी वाढून 53 हजार 611 रुपये झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर राजधानीतही दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने माहिती दिली. मागील सत्रात नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 271 रुपये होता.

सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर वाढले आहेत. चांदी प्रति किलो 1 हजार 306 रुपयांनी वाढून 69 हजार 820 रुपये झाले आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 68,514 रुपये होता.

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 340 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस हा 1,954 डॉलरने वाढला आहे. तर चांदीचा दर प्रति औंस हा 26.81 डॉलरने वाढला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत चिंता असल्याने सोन्याच्या किमती सोमवारी वाढल्याचे पटेल यांनी सांगितले. कोरोना महामारीत अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता असल्याने सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details