महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नाशिक : तीनच दिवसात सोने ३,२०० रुपयांनी महाग - PNG showroom gold prices

सोन्याचा दर स्थानिक बाजारात शुक्रवारी ३८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होता. याच रात्री अमेरिकेने इराणचा टॉप कमांडर सुलेमानी यांना ठार मारल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

customer buying gold
सोने खरेदी

By

Published : Jan 6, 2020, 4:19 PM IST

Updated : Jan 6, 2020, 5:49 PM IST

नाशिक- शहरामध्ये गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. तीन दिवसात तब्बल ३,२०० रुपयांनी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. ग्राहकांना २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळासाठी ४० हजार ३०० रुपये मोजावे लागत आहे. तर ३ टक्के जीएसटीसहीत हाच भाव ४१ हजारांवर पोहोचला आहे.

सोन्याचा दर स्थानिक बाजारात शुक्रवारी ३८ हजार ८०० रुपये प्रती तोळा होता. याच रात्री अमेरिकेने इराणचा टॉप कमांडर सुलेमानी यांना ठार मारल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढले आहेत. तर रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होत आहे.

अर्थतज्ज्ञांच्या मते भविष्यात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होणार आहे. सोन्याचा भाव ५० हजार रुपये प्रति तोळापर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सोन्याचे वाढलेले भाव
सोन्याची गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे नागरिक सोन्याची खरेदी करत असल्याचे पु. ना. गाडगीळ शोरुम मॅनेजरच्या व्यवस्थापिका स्वाती जाधव यांनी सांगितले.

एक नजर टाकूया सोन्याच्या कॅरेट नुसार प्रतितोळा भाव ( जीएसटी विरहित,रुपयात)

अनुक्रमांक

एकक

दर (रुपयामध्ये)

१८ कॅरेट सोने

३२,८२०

२२ कॅरेट सोने

४०,३००

२३ कॅरेट सोने

४१, ७५०

२३.५ कॅरेट सोने

४२,०५०

१ किलो चांदी

४९,५००

Last Updated : Jan 6, 2020, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details