नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा (10 ग्रॅम) 881 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा 44,701 रुपये झाल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 43,820 रुपये होता.
चांदीचे दर प्रति किलो 1,071 रुपयांनी वधारून 63,256 रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 62,185 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1,719 डॉलरने वाढले आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 24.48 डॉलर आहेत. जागतिक बाजारात परिस्थिती सुधारत असल्याने दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांचा 'गंजाम पॅटर्न'; विजय कुलांगे यांची विशेष मुलाखत