नवी दिल्ली - सोन्याची खरेदी करण्याचे नियोजन असलेल्यांची चिंता वाढविणारी बातमी आहे. सोन्याचा दर प्रति तोळा १८७ रुपयाने वाढून ३९,०५३ रुपयावर पोहोचला आहेत.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ३८,८६६ रुपये होता. सोने प्रति तोळा १८७ रुपयांनी दिल्लीच्या बाजारपेठेत आज महागले आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-शेतकरी जगवायचा असेल तर आयात थांबवा; कांदा उत्पादकांची आर्त हाक
सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो ४९५ रुपयांनी वाढले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ४६,९९ रुपये झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा ४६,००४ रुपये होता. जागतिक बाजारपेठेत सोने प्रति औंस १ हजार ४८४ डॉलरने वाढले आहे. तर चांदी प्रति औंस हे १७.३६ डॉलरने वाढले आहेत. सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदारांचा सोन्यातील गुंतवणुकीकडे ओढा वाढला आहे. तसेच आगामी नाताळच्या तोंडावर बाजारात अनिश्चितता असल्याने सोन्याचे दर वाढल्याचे पटेल यांनी सांगितले. रुपया आज डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरला आहे.
हेही वाचा-मावळ डेअरी पुढील वर्षी मुंबईच्या बाजारपेठेत करणार दूध विक्री - टाटा पॉवर