महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने महागले! जाणून घ्या, कारण... - सोन्याचा भाव

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढल्याचेही पटेल यांनी सांगितले.

Gold rates
सोन्याचे दर

By

Published : Feb 20, 2020, 5:09 PM IST

Updated : Feb 20, 2020, 5:39 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या किमतीने आज उच्चांक गाठला आहे. दिल्लीत सोने प्रति तोळा १११ रुपयांनी वधारून ४२,४९२ रुपये झाले आहे. मागील सत्रात सोने प्रति तोळा (१० ग्रॅम) ४२,३८१ रुपये होते.

सोन्याच्या किमती वाढल्या असल्या तरी चांदीच्या किमती प्रति किलो ६७ रुपयांनी घसरल्या आहेत. चांदीचा दर प्रति किलो ४८,५९९ रुपये झाला आहे.

रुपया सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढल्याचेही पटेल यांनी सांगितले.

हे आहे सोन्याचे दर वाढण्याचे कारण

  • रुपयाची घसरण झाल्यानंतर भारतीय चलनाच्या विनिमयाचे दरही बदलतात.
  • सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
  • कोरोना विषाणुमुळे जागतिक आर्थिक मंचावर अस्थिरता आहे.
Last Updated : Feb 20, 2020, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details