महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा ४६० रुपयांची वाढ; रुपया कमकुवत झाल्याचा परिणाम

रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेल्या घसरणीचा सोन्याच्या दरवाढीत परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. तसेच वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरामुळेही सोन्याचे दर वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित - सोन्याची बाजारपेठ

By

Published : Sep 16, 2019, 5:05 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचा दर प्रति तोळा ४६० रुपयांनी वाढून आज ३८ हजार ८६० रुपये झाला आहे. डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेल्या रुपयामुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

चांदीचा दर प्रति किलो हा ४७ हजार ९५७ रुपये झाला आहे. शनिवारी चांदीचा दर हा ४६ हजार ८६१ रुपये होता. तर सोन्याचा प्रति कॅरट दर शनिवारी ३८ हजार ४०० रुपये होता.

हेही वाचा-सोन्याच्या दराचे प्रमाणीकरण करण्यावर सरकारचा विचार सुरू


रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेल्या घसरणीचा सोन्याच्या दरवाढीत परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. तसेच वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरामुळेही सोन्याचे दर वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- अहमदनगर: बैलाने घेतला सोन्याचा घास; दागिन्यासाठी गृहिनीला सासरचा धाक

मध्यपूर्वेतील तणावानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचे प्रमाण वाढविले आहे. कोमेक्स इंटरनॅशनलमध्ये सोन्याचे दर १ टक्क्यांनी वाढले आहेत. सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर जगभरात वाढले आहेत.

हेही वाचा-स्विमींगपुलमधील पाण्याखाली मिळाली सोन्याची बनावट बिस्कीटं; विशेष तपास पथकाची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details