नवी दिल्ली- इराण-अमेरिकेतील तणाव निवळल्यानंतर सोन्या-चांदीचे दर आज मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सोने प्रति तोळा ७६६ रुपयांनी घसरून ४०,६३४ वर पोहोचले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने आणि जागतिक बाजारातील मागणी घटली आहे. अमेरिका-इराण हे दोन्ही देश टोकाच्या मार्गावरून मागे वळल्याने सोन्याचे भाव घसरले आहेत. दोन्ही देशातील तणाव कमी झाल्याने जोखीम असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख देवार्ष वकील यांनी सांगितले. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात अधिक सुरक्षित मानली जाते. येत्या काळात लग्नसराईच्या मागणीवर सोने-चांदीची भाववाढ अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.