नवी दिल्ली - सोन्याचा भाव प्रति तोळा ४८५ रुपयांनी वाढून ४१,९१० वर पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि रुपयाच्या घसरणीने सोन्याचा भाव वाढला आहे.
चांदीचा भाव प्रति किलो ८५५ रुपयाने वाढून ४९,५३० पोहोचला आहे. मंगळवारी चांदीचा भाव प्रति किलो ४८,६७५ रुपये होता. बाजार बंद होताना सोने प्रति तोळा ४१,३२५ रुपये होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख सल्लागार देवार्ष वकील म्हणाले, इराण-अमेरिकेतील तणाव वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. या कारणामुळे सोन्याचा भाव वाढल्याचे वकील यांनी सांगितले.
हेही वाचा-'या' सहा सरकारी कंपन्यांत होणार निर्गुंतवणूक; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी