महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा ४२० रुपयांची घसरण, 'हे' आहे कारण - Gold prices fall

सोन्यापाठोपाठ चांदीची किमतही घसरली आहे. चांदी प्रति किलो ८३० रुपयांनी घसरून ४८,६०० रुपये झाले आहेत

Gold
सोने दर

By

Published : Jan 7, 2020, 4:31 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ४२० रुपयांनी घसरून ४१,२१० रुपये झाले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्याने सोन्याचे दर घसरले आहेत. नफा नोंदविल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीची किमतही घसरली आहे. चांदी प्रति किलो ८३० रुपयांनी घसरून ४८,६०० रुपये झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सल्लागार प्रमुख देवार्ष वकील म्हणाले, १५ जानेवारीपासून सण सुरू होत आहे. तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढेल, याबाबत व्यापारी आशावादी आहेत. अमेरिका-चीनमधील व्यापारी करार आणि अमेरिका-इराणमधील तणाव हा सोने दरवाढीवर परिणाम करणारा घटक राहणार आहे. कोणत्याही अनिश्चिततेने सोन्याच्या किमती वाढणार असल्याचेही वकील यांनी सांगितले.

हेही वाचा- सरकारी बँकांची सेवा विस्कळित होण्याची शक्यता; उद्या कामगार संघटनांचा संप

सकाळच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत २२ पैशांनी वधारून ७१.७१ वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १,५६८ डॉलरने घसरला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो १८.९९ डॉलरने घसरले आहेत. सोन्याचे दर सोमवारी प्रति तोळा ४१,६३० रुपये होते. हा सोन्याचा आजपर्यंतचा सर्वाधिक दर होता.

हेही वाचा-'रिलायन्स'ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; केंद्र सरकारची फेटाळली 'ही' याचिका

ABOUT THE AUTHOR

...view details