नवी दिल्ली -सोन्याच्या दरात नवी दिल्लीत प्रति तोळा २०८ रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळा ४४,७६८ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने देशातही सोन्याचे दर कमी झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,९७६ रुपये होते. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचे दर प्रति किलो ६०२ रुपयांनी वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ६७,५९२ रुपयांवरून ६८,१९४ रुपये झाला आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराचा निर्देशांक १,१४८ अंशाने वधारला; वित्तीय कंपन्यांचे शेअर तेजीत