नवी दिल्ली - सोन्याची किंमत प्रति तोळा (१० ग्रॅम) १ हजार ९७ रुपयांनी कमी होवून ४२,६०० रुपये झाली आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्यानंतर गुंतवणूकदार हे सोन्याव्यतिरिक्त इतर मत्तेमध्ये (असेट्स) गुंतवणुकीकडे वळाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात १० टक्क्यांनी घसरण झाली होती. मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक १,३२५.३४ अंशांनी वधारून ३४,१०३.४८ वर स्थिरावला.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४३,६९७ रुपये होता. चांदीची किंमत प्रति किलो १ हजार ५७४ रुपयांनी घसरून ४४,१३० रुपये झाली आहे.