महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा २४१ रुपयांची वाढ - gold price news

सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो ७८१ रुपयांनी वाढून ६८,८७७ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,०९६ होता.

gold rate
सोने दर

By

Published : Mar 1, 2021, 8:45 PM IST

नवी दिल्ली- सोन्याच्या दरात दिल्लीत आज प्रति तोळा २४१ रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा ४५,५२० रुपये आहे. जागतिक बाजारात मागणी वाढल्यानंतर देशात सोन्याचे दर वाढले आहेत.

मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४५,२७९ रुपये होते. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो ७८१ रुपयांनी वाढून ६८,८७७ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,०९६ होता.

हेही वाचा-एलपीजी गॅसमध्ये आणखी २५ रुपयांची दरवाढ; एका महिन्यांदा चौथ्यांदा महागाईचा चटका

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा २४१ रुपयांनी वाढले आहेत. जागतिक बाजारात पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत आज वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस १,७५३ डॉलर आहेत. तर चांदीचे दर प्रति औंस २६.९० डॉलर आहेत.

हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात

ABOUT THE AUTHOR

...view details